कोरोनाविरुद्ध लढण्यास प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत योगप्राणविदयाची तंत्रे : डिंपल कोठारी
पुणे : सध्याच्या काळात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढविणे अतिशय महत्वाचे आहे,त्यासाठी योगप्राण विद्या तंत्रे अतिशय फायदेशीर आहेत असे मत योगप्राणविद्याचा पुणे येथील ट्रेनर डिंपल कोठारी यांनी व्यक्त केले. संस्थेचे पुण्यातील ट्रेनर्स यांच्यासह डिंपल कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात शंकरशेठ रोड येथे नियमित ध्यान शिबीर व ऊर्जाउपचार शिबिरांचे आयोजन केले जाते. त्याचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे,त्यामुळे अनेकजण यात सहभागी होत आहेत. संस्थेबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या , योग प्राण विद्या संस्थेचे संस्थापक प्रमुख श्री एन जे रेड्डी हे निवृत्त वायुसेना अधिकारी आहेत,त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी योगप्राणविदयामार्फत अनेक ट्रेनर्स आणि ऊर्जा उपचारक (एनर्जी हीलर्स कार्यरत आहेत. संस्थेचा विस्तार केवळ देशांतर्गत नसून अनेक देशांमधून लोक योग प्राण विद्याशी आहेत . सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे संस्थापक श्री फेसबकच्या माध्यमातन सर्वांसाठी दिवसातून तीन वेळा प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीचे श्र्वसनाचे व्यायाम, शारीरिक व्यायाम, ध्यान, दैवी उपचार, क्षमासाधना इचा सराव करून घेत आहेत. ज्यातून आपले शारीरिक,मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. ज्याचा जगभरातील लोकांना फायदा होत आहे. अनेकांनी https://www.facebook.com/ShriNJReddy/ या फेसबुक पेजवर त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा फायदा करून घ्यावा अशी विनंती डिपल कोठारी यानी केली.योगप्राणविदयाच्या तंत्रांचा सर्वांना लाभ घेता यावा संस्थेमार्फत ठिकठिकाणी ऊर्जा उपचार शिबीर घेतले जातात, ज्यामध्ये शाखशुद्धरित्या उपचारतंत्र शिकलेले उपचारक उपस्थित असणाऱ्या रुग्णांवर रुग्णांवर मोफत ऊर्जा उपचार करतात. त्याचप्रमाणे, मनःशांतीसाठी मोफत ध्यानधारणा केले जाते. संस्थेमार्फत केवळ उपचार केले जात नाहीत तर ज्यांना ऊर्जा उपचार तंत्र शिकायचे आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. हे वर्ग सशुल्क आहेत. सध्याच्या परिस्थितीत योग प्राणविदयाचे अनेक प्रशिक्षित उपचारक कोबीड -१९ ग्रस्त रुग्णांवर उपचार करत आहेत त्यातील अनेक रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्याही प्रतिक्रिया फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत. योग प्राण विदया ऊर्जा उपचार पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. तसेच ही पूरक उपचार पद्धती आहे म्हणजे इतर उपचारांसह हे उपचार दिले जातात. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. हे विनास्पर्श ,विना औषध उपचार तंत्र आहे. ऊर्जाउपचार सर्दी खोकल्या पासून ते मायग्रेन, गुडघे दुखी, मधुमेह, दमा, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर प्रभावी ठरतात. शारीरिक आजारांप्रमाणेच तणाव, डिप्रेशन, चिंता, भीती, व्यसनाधीनता, नातेसंबंध यांवर देखील ऊर्जाउपचार उपयुक्त ठरतात. या उपचाराचे वैशिष्ट्य म्हणजे ऊर्जेच्या माध्यमातन उपचार होत असल्यामुळे रुग्ण प्रत्यक्ष उपस्थित नसताना देखील दूरस्थ उपचार करणे शकत आहे.योगप्राणविदयाचे पृथ्वीशांतीचे ध्यान, ध्यानापूर्वीचे व नंतर करावयाचे शारीरिक व्यायाम, श्र्वसनाचे व्यायाम, क्षमासाधना, सुपरब्रेन आसन हे सर्व धझत साधना अपवर सर्वासाठी मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या प्रशिक्षक डिंपल कोठारी यांच्याशी संपर्क साधावा - ९१३०० ३३८३३.