मोफतच्या राशनसाठी नगरसेवकांच्या शिफारशींची अट जाचक आणि पक्षपाती!

मोफतच्या राशनसाठी नगरसेवकांच्या शिफारशींची अट जाचक आणि पक्षपाती!


माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची टीका


चौफेर महाराष्ट्र न्यूज, २४ मे - राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये सामाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना मे आणि जून २०२० या दोन महिन्यांसाठी प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. सामाजिक व आर्थिकदृष्टया दुर्बल, विस्थापित मजूररोजंदारीवरील मजूर यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तथापि, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरसेवकाची लेखी शिफारस घ्यावी, अशी पिंपरी चिंचवड महापालिकेने घातलेली अट जाचक असून पक्षपाती आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी, अशी जोरदार मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे. उद्वेलल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानसार राष्टीय अन्नसरक्षा योजना तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये सामाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका सुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे, मात्र अद्यापपर्यंत वितरणासाठी त्यांना शिधापत्रिका मिळालेली नाही तसेच अन्नधान्याची गरज असलेले सामाजिक आणि आर्थिकदृष्टया दुर्बल, वितरण विस्थापित मजूर, रोजंदारीवरील मजूर यांना या योजनेत धान्य वितरण करावी लागणार आहे. तांदळ वितरणासाठी प्रत्येक वितरण केंद्रावर पुरेसा कर्मचारी वृंद उपलब्ध राहणार असून प्रत्येक स्वस्त धान्य वितरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहे. महापालिकेने छापलेल्या अर्जात तसे नमूद आहे. तथापि, त्यामुळे राजकीय आखाडा तयार होऊन पक्षपात होऊ शकतो. भीक नको पण कुत्रे आवर अशी अवस्था उद्भवू शकते. राजकीय साठमारीचा फटका गोरगरीब जनतेला बसू शकतो.