कर विभागालाही लांकडाऊनचा तडाखा

कर विभागालाही लांकडाऊनचा तडाखा


पुणे : लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या करसंकलन विभागास चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. १ एप्रिल ते २२ मेदरम्यान करसंकलन विभागास १९१ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत हे उत्पन्न समारे ४४३ कोटींचे होते. दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत कर भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात सुमारे ५ ते १० टक्के सवलत महापालिकेकडून दिली जाते. त्यामुळे एकूण करसंकलानाच्या ६० टक्के कर या दोन महिन्यांत संकलित होतो. मात्र, यंदा तब्बल २५० कोटींची तूट आली आहे. लॉकडाऊनमुळे बिलांचे वाटपच महापालिकेस करता आलेले नाही. त्यामुळे सुमारे साडेअकरा लाखांपैकी सुमारे ९ लाख मिळकतधारकांना एसएमएसद्वारे बिले पाठविली होती. त्यात कर भरण्याची लिंक दिली होती. त्यावर आतापर्यंत १७१ कोटी रुपयांचा कर पुणेकरांनी ऑनलाइन भरणा केला आहे. आली तर सुमारे २२ कोटींचा कर ऑफलाइन स्वरूपात म्हणजेच धनादेश तसेच रोख रकमेच्या स्वरूपात जमा झाला आहे. १० दिवसांत २२ कोटी रु. जमले केंद्रशासनाने तिसऱ्या लॉकडाऊननंतर शिथिलता दिली आहे. यानंतर महापालिकेनेही ११ मेपासून शहरात वेगवेगळ्या २७ ठिकाणची नागरी सुविधा केंद्र तसेच आहेत..


 येथे गेल्या दहा दिवसांत सुमारे २२ कोटींचे कर संकलन झाले आहे. कर भरण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येत असल्याने मागील वर्षाचे बिल केंद्रात दाखवून नागरिकांना यंदाचा कर भरणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकही कर भरण्यास प्रतिसाद देत आहेत,